Powered By Blogger

Tuesday, December 20, 2011

'' गेले ते दिवस '' ''राहील्या त्या फक्त आठवणी ""

"ते आयुष्याच काय ........... ज्यात प्रेम नाही
ते प्रेमच काय ............. ज्यात आठवणी नाही
त्या आठवणीच काय .......... ज्यात तू नाही
आणि,
ती तूच काय ............ ज्यात मी नाही" ♥
'' गेले ते दिवस '' ''राहील्या त्या फक्त आठवणी ""

Sunday, April 10, 2011

एक नादखुळं.............

एक नादखुळं उनाड पाखरू होतो मी,
त्याला हवहवसं फूल होतीस तू..
बेधुन्द नदीसारखा होतो मी,
त्याला दिशा देणारे काठ होतीस तू..
एका को-या पानासारखां होतो मी,
त्यावर शब्दा लिहणारी होतीस तू..
शब्दभावनेचा वेडा सागर मी,
भरती ओहोटीचा चन्द्र होतीस तू....

मी तुला..........

मी तुला माझी सावली समजत होतो,
अशी सावली - जी कधीही साथ न सोडून जाणारी,
दुनियेला अभिमानाने सांगत होतो आपलं अटूत नातं,
पण, मी हे विसरून गेलो होतो की -
सावली ही साथ सोडून देते - "अंधारात"...

Saturday, April 9, 2011

इतुश्या आयुष्यात...

इतुश्या आयुष्यात मी काय काय पाहिले
आज अचानकच याच्या हिशोबास बसले...

अनुभवला तो बालपणीचा निरागसपणा
कधी हासू तर कधी मस्तीचा तो नझराणा...

अभ्यासासाठीचा आईचा धाक कधी
तर मिळे छान कौतुकाची थाप कधी...

बाबांचा तर असे फार जीव
कशाला भासेल मग कुठलीच उणीव...

शाळेत होते अगदी पुस्तकी किडा
कॉलेजमध्ये उचलला खोडकरपणाचा विडा...

पाहिला मग पहिल्या पगाराचा आनंद
चालले होते हे आयुष्य छान बेधुंद...

वळणावळणाच्या या आयुष्यात
पाहिले मी भावनांचे रंगही सात...

पाहिली कधी आनंद देणारी नाती
तर कधी नकोशी झालेली नाती...

लाभली सुखदायी खुपशी मैत्री
आहे जिथे विश्वासाची खात्री...

कधी दिला सा-यांना मायेचा अनुराग
तर कधी कुणा दिला भयंकर राग...

मिळाला कधी विश्वासघाताचा अनुभव
तर कधी कुणी विश्वास न ठेवण्याचा घाव...

हुळहुळणा-या प्रेमाची गोडी चाखली
मग विरहाची मजाही घेतली...

होवून गेले कुणा परक्याचे जवळचे
तर कधी कुणा आपल्याचे लांबचे...

नशिबास सुख-दु:ख दोन्हीही आले
कडू-गोडश्या अनुभवाने हे आयुष्य भरले...

काय बरे असेल पुढचा नियतीचा घाट
याचीच पाहत आहे मी आता वाट...

इतुश्या आयुष्यात आता काही पहायचे ना उरले
नसे खंत कसलीच आज जरी हे डोळे मिटले...

स्वप्न्नसख्या...

तुझे ते चिडून जाणे माझ्यावर
मग हळूच स्वत:ला सावरणे...

कधी खळाखळा हसता हसता
खोड्या माझ्या त्या काढणे...

लटक्या माझ्या रागासाठी
तुझे तास न तास मनवणे...

धरिता अबोला मी जर
तुझे ते कासाविस होणे...

चुक झाली कितीही मोठी
तरीही तुझे माफ़ करणे...

डोळ्यात येता आसवाचा पुर
तू हलकेच माझी टीपे पुसणे...

चिडले असता कधी मी
ते इवलासा चेहरा करणे...

फुलासारखे जपता जपता
सगळा त्रास स्वत:च घेणे...

जरी असले मी सामान्य
तुझे मला ते ख़ास बनवणे...

स्वप्न्नसख्या पुरे आता स्वप्न्नातल्या भेटी
कधी रे होईल तुझे वास्तवात येणे...

Thursday, April 7, 2011

आठवण माझी..................

आठवण माझी कधीतरी येईलच तुला,
तु कदाचीत रडशीलही,
हात तुझे जुळवुन ठेव तु,
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील,
जो थांबला तुझ्या हातावर,
नीट बघ त्याच्याकडे,
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल.....