Powered By Blogger

Saturday, January 15, 2011

मी हि कुठेतरी वाचलेलं........

मी हि कुठेतरी वाचलेलं.........

दुखाच्या घरी एकदा जमली होती पार्टी
दुखाच्या घरी एकदा जमली होती पार्टी
दारू बिरू पियुन अगदी झींगली होती कार्टी.


दुख म्हणाले "दोस्तानो!!
बिलकुल लाजू नका
इतके दिवस छळले
म्हणून राग मानू नका


मनात खूप साठलं आहे
काहीच सुचत नाही
माझी स्टोरी सांगितल्याशिवाय
आता राहवत नाही


मी आणि सुख दोघे
जुळे भाऊ होतो
पाच वर्षाचे होतो तेव्हा
जत्रेत गेलो होतो


गर्दी अशी जमली
नि गोंधळ असा उठला......
माणसांच्या त्या गर्दीमध्ये
सुखाचा हात सुटला


तेव्हापासून फिरतोय शोधत
दुनियेच्या जत्रेत
दिसतेका सुख माझे
कोणाच्याही नजरेत


सूखाबरोबरचे लहानपणीचे
क्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीने
दुख ढसाढसा रडले
नशा सगळ्यांची उतरली
दुखाकडे पाहून
दुखालाही सुख मिळावे
वाटले राहून राहून


सुखाच्या शोधामध्ये आता
मी सुद्धा फिरतोय
दुखाला शांत करायचा
खूप प्रयत्न करतोय


जीवनाच्या रथाचे
आहेत सुख दुख सारथी
सुख मिळाले तर दुखाच्या घरी
मीच देईन पार्टी.......

काळीज रडतंय मी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर सांगितली अन थोड्याच वेळात रूम तिची गाठली, पत्रीकेसोबत त्या भाबडीने हात तिचा कापला होता .. मी जाण्यापूर्वी श्वास कधीच सोडला होता...

मी म्हंटल "अगं मी काहीही करेन तुझ्यासाठी
तुला हसतं पाहण्यासाठी,तुझी आस्व पुसण्यासाठी
तू फक्त होय म्हण ग,जीव तुझ्यातच गुंतलाय सारा "

तिनेही लाजत म्हंटल "हो राजा मी तुझीच आहे रे,
माझ्याही श्वासाला गरज तुझीच आहे रे"

मग कसं कोण जाने,ती माझ्या मिठीत विरून गेली,
विर्घळूनच गेली, अगदी माझ्याही नकळत!!

आता मी मी राहिलो नव्हतो,न ती ती उरली होती
दोघानाही आता ओढ लग्नाची लागली होती..

मग न जाने का , नजर माझीच लागली .....

मी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर सांगितली
अन थोड्याच वेळात रूम तिची गाठली, पत्रीकेसोबत

त्या भाबडीने हात तिचा कापला होता ..
मी जाण्यापूर्वी श्वास कधीच सोडला होता...

पुन्हा येऊन पाहून जा ग
पत्रिका आहे आपल्याच लग्नाची ..
सोंग केलं होतं ग मी सारं...
फक्त तुला जळवण्यासाठी ..
ग प्रिये थोडं जळवण्यासाठी..

आज तिच्या प्रेतासोबत
माझंही प्रेत जळतंय...

जीव सोडला आहे....
तरीही काळीज रडतंय...
काळीज रडतंय........

खेळ हा शब्दांचा, मनाला कळत नाही..!!!!

शब्दांच्या या दुनियेत, मन माझे रमत नाही

कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!

शब्दांच्या प्रवासात
ओळ काही मिळत नाही,
वेचली अनेक शब्द फुले
पण शब्द शब्दाला जुळत नाही

खेळ हा शब्दांचा, मनाला कळत नाही,
कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!

रचल्या शब्दांच्या ओळी,
पण यमक काही जुळत नाही,
लिहिलेल्या कवितांना मग
अर्थ काही उरत नाही,

कशी आहे हि वेळ, सरता सरत नाही,
कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!

दुर दुर माझ्या स्वप्नांमध्ये एकदा तरी चालत येशील का? जग आज वेगळे असेल तुझे.....

दुर दुर माझ्या स्वप्नांमध्ये
एकदा तरी चालत येशील का?
जग आज वेगळे असेल तुझे
स्पनांत तरी माझी होशील का...?

मी आहेच असा खुळा वेडा
तुझी सदा नुसती गंमत केली
सगळं जग हसतयं माझ्यावर
आज तु हि एकदा हसशील का...?

बघ ना खेळु आपण आज
पुन्हा तोच आपला खेळ
अर्धा अधुरा प्रत्येक वेळी
आज तरी पुर्ण करशील का….?

माहित आहे मला आज सगळं
ना खेळु शकतं ना येऊ शकतं तु
मीच निरंतर जळता सुर्य दिवसा
रात्रीला तरी चांदणं देशील का…?.

वाट पाहतोय असाच वेडा बनुन
एकदा तरी वाट चुकशील का
आयुष्य हे असेच चालले निघुन
पुढल्या जन्मी तरी माझी होशील का.....?

आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो.....

आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो
हाक आल्या क्षणाला, वेड्यासारखे धावलो
लोकांनी आपले सगळी, कामं साधून घेतली
आणि आपल्या वेळेला मात्र, सहज पाठ फिरवली
झगडत राहिलो, लढत राहिलो, त्यांच्यासाठी करत राहिलो
आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो...
तूच रे तूच, कायम आपला दोस्त
तुझ्यासोबत मित्रा आपण, दंग आयुष्यात मस्त
शब्दांमधून प्रेम आणि, पाठीवर एक थाप फक्त
प्रसंग आला की सगळ्यांचं प्रेम, वाऱ्यासोबत उडून जातं
आपण त्यांच्या साथीसाठी, वाट कायम पाहत राहतो
मनामध्ये कल्पनांचे, अनेक मनोरे बांधत राहतो
एका क्षणाला वाटतं मग, आपण खरंच फसलो
आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो...
असल्याक्षणी आपल्या वाट्याला , फक्त मनस्ताप येतो
विचारांचा अवास्तव गोंधळ, मनामध्ये माजतो
आपले मित्र म्हणता म्हणता, सगळेच काम साधतात
वेळ सरली की सहज, आपल्याला बाजूला सारतात
मग वाटत राहतं "आपण का नाही असे कधी वागलो?"
हिशोबांच्या या दुनियेत, इतके बेहिशोबी ठरलो
आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो....
मित्र मित्र म्हणणारे, सिगारेटच्या धुरासोबत उडून जातात
ओंजळीतल्या वाळूसारखे, नकळत निसटून जातात
मग विचार येतो मनात, आपण नक्की काय केलं
भरल्या आपल्या ओंजळीत, काहीच कसं नाही राहिलं
सुखाच्या सगळ्या क्षणांत फक्त, आठवण बनून साठलो
आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो...
मग थोडासा प्रयत्न होतो, इतरांसारखं वागायचा
लोकांच्या सवयीप्रमाणे, आपलं आयुष्य जगायचं
खरं काय खोटं काय, कळेनासं होतं मग
नसलेल्या गोष्टी करता करता, आपणच हरवतो
नाद सोडायचा ह्या सगळ्याचा, निदान स्वतःच्या नजरेत तरी नाही उतरलो
पण आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो.....
आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो.....

Thursday, January 13, 2011

आठवण आईची ......

आई ......       
ममतेचा आधार
स्वर्ग सुखाचा दार 

आई ......    
प्रेमाचा सुखद गारवा
विश्रांतीचा प्रेमळ विसावा

आई ...... 
संसाराचे एक चाक
कुटुंबाच्या पाठीचे बाक

आई ......    
वात्सल्याचे दुधाळ नदी
तहानलेल्या  लेकराची   

आई ......    
कल्परुक्षाचे मूळ
समाधानाचे गोड फळ

आई ......    
जगताची माउली
प्रेमाची  सावली

आई ......    
विश्वासाचा हात
सर्व संकटावर करी मात

आई ......    
कुटुंबाचा श्वास
भरावी मोहाचा प्रेमळ घास

आई ......    
पोर्णीमाचा शीतल प्रकाश
फुलांचा सोज्वळ सुवास

आई ......    
करुणेचा विशाल सागर
मायेचा मखमली पदर

आई ......    
उगवती सोनेरी सकाळ
मावळती चंदेरी रात्र

आई ......    
शब्दांचा प्रेमळ जयघोष
जिव्हाळ्याचा मधुर कोश

आई ......    
लक्ष्मीची सोनेरी पाऊल
स्वप्नी आनंदाची चाहूल

आई ......    
आशिर्वादाची छत्रछाया
सुखी संसाराची माया

आई ......    
सुसंस्काराची जणू समई
मुले जणू फुले जाई जुई

आई ......    
प्रत्येकाच्या घराचा पाया
त्याविना  घर वाया

आई ......    
देई जगण्याला सोनेरी चमक
कुटुंबातील घुंगराची धमक

आई ......  
कल्पतरू माझ्या आयुष्याची
माझ्या आयुष्याची एक चित्रकार

आई ......    
आत्मा आणि ईश्वराचे स्वरूप
भूतलावरील भगवंताचे रूप

आई ......    
माझी रत्नजडीत आठवण
तिच्या विरहाची वणवण

आई ......    
पाठीवरची मायेची थाप
तुजवीण जीवन आहे एक शाप

आई ......   
नसलेल्या अस्तित्वाचा तुझा तो पदर
करुणेने दाटून आली माझ्या मनाची चादर


आई ......
काळाच्या पडद्याआड जरी गेली तुझी छाया
त्या छायेत हरवली माझी काया


आई ......    
तुझी आठवण येते परत कधी येशील
मायेचे प्रेमळ घास परत मला कधी भरवशील

आई ......
कधी या पिल्लाला गौनजार्शील
परत कधी ती अंगाई गाशील  

Tuesday, January 11, 2011

एका मुलीने ने देवाला विचारलं प्रेम काय असत ?

एका मुलीने ने देवाला विचारलं प्रेम काय असत ?
देव म्हणाला

बागेतून एक फुल घेवून ये.

ती मुलगी फूल आणायला गेली ,

तिला एक फूल आवडल ,

पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत ,

ती पुढे चालली गेली ,

पण तिला चांगल फूल नाही मिळाल ,

जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली ,

तेव्हा ते फूल तिथे नव्हत ,

तिला खूप पश्चाताप  झाला ,

तिने देवाला येऊन सांगितलं ,

तेव्हा देव म्हणाला , " हेच आहे प्रेम "

जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत .

तेव्हा त्याची कदर नाही करत ,

पण जेव्हा ते निघून जाते  तेव्हा कळते  ते काय असत ..!!

कधी कधी का रे तू असा वागतोस ?

कधी कधी का रे तू असा वागतोस ?
असे वाटते जणू काही तू तुझ्यातच नसतोस.........

कधी कधी शब्द तुझे,
इतके कोरडे का होतात ?
कधी कधी डोळे तुझे
इतके निस्तब्ध का होतात ?

नेमकं काय होतं तुला, जेव्हा तू म्हणतोस,
" मला काहीही झालेलं नाहीये "
मला सांग इतक्या दिवसांत,
काय मी तुला एवढेही ओळखलेलं नाहीये ?

किती बरं वाटतं जेव्हा तू,
एखाद्या गोष्टीचं कारण
समजावून सांगतोस...
आणि खुप अस्वस्थ होतं जेव्हा,
मला कारण कळत नाही की,
तू असा का वागतोस.....

कठोर बोलून, माफ़ी मागायला
तुझं काय जातं.....
चूका करुन, चुकलो म्हणायला
तुला बरं येतं.........
पण तुला काय ठावुक त्या थोड्या वेळात
माझं मन किती व्याकुळ होतं,
त्या थोड्या वेळात ते अक्षरश:
तुटून तुटून वेगळ पडतं....

मी तुझ्या इतकी व्यवहारी नाहीये रे,
माझं मन तुझ्या इतकं घट्ट नाहीये रे,
तुझ्याइतका सहजपणा जर देवाने
मला दिला असता,
तर कदाचित आज हा प्रश्नच
मला पडला नसता,

मी तुला प्रश्नाचं उत्तर
मागत नाहीये,
पण का वागतो तू असा
मला खरचं कळत नाहीये,

एरव्ही, तू मला नेहमीच खुप समजुन घेतोस,
पण कळत नाही कधी कधी तू,
असा का वागतोस ?

आयुष्य माझे......

आयुष्य माझे......
एक कलर प्यालेट  सप्तरंगी आठवणी
बहुरंगी ब्रुश, आणि
एक कोरा क्यान्वास

आयुष्य माझे......
एक मोकळे  आकाश स्वप्नांची भरारी
आयुष्याची  शर्यत, आणि
प्रगतीची  यशस्वी वाटचाल  

आयुष्य माझे......
एक संध्याकाळ चार मित्र
ती कप चहा
एक टेबल

आयुष्य माझे......
चार गाड्या
आठ मित्र
सुटे पैसे, आणि
एक मोकळा रस्ता

आयुष्य माझे......
मित्राचे घर
हलका पाऊस
गरम कांदाभजी, आणि
ओल्या गप्पा

आयुष्य माझे......
कॉलेजचे ते मित्र
बंक केलेलं लेक्चर
तिघात एक वडापाव, आणि
बिलावरून भांडण

आयुष्य माझे......
तोंडात  आलेली एक शिवी
टपलीत बसल्यावर आणखी एक शिवी
सौरी बोलल्यावर आणखी एक शिवी

आयुष्य माझे......
पाच वर्षानंतर
अचानक जुन्या मित्राची भेट
धुळीत पडलेला फोटो, आणि
डोळ्यातले आनंद अश्रू

आयुष्य माझे......
तिची सुंदर नजर
चेहऱ्यावरील नाजूक भ्रांती
नजरेला  न कळलेली नजरेची भाषा
आयुषभर  तिची वाट बघणारे माझे मन

आयुष्य माझे......
मायेच्या सावलीवीन अधुरे
प्रेमाच्या ओलाव्याच्या शोधात
आईच्या हरवलेल्या पदरात, आणि
तिच्या कुशीत चिरशांती ...........

Monday, January 10, 2011

तू गेल्यावर....Guru Thakur

आठवणींचा धसका आणिक भय स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे

चिंब भिजावे मनी वाटते शहारतो मी
व्याकूळ होऊन मेघ सावळे चितारतो मी
परी विसरतो कधी न झरती ढग स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे

जाळून जाते दुपार धुमसत सांज वितळते
मिठीत गहि-या अलगद जेव्हा रात्र कवळते
चहुबाजुंनी मला भेदिती शर स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे

तसाच ढळतो दिवस आणखी रात्री सरती
तसेच आहे जग हे सारे अवती भवती
तरी वाटते उलटून गेले युग स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे

Sunday, January 9, 2011

कविता,..1

कविता,........

कधी सांज वेळी ......

कधी सांजवेळी .........

कधी सांज वेळी मला आठवोनी
तुझ्या भोवताली जराशी वळूनी
पाहशील का??

तुझा दूर येथे उठू दे शहारा
शरीरावारुनी जसा गार वारा
वाहशील का??

रिते सूर आता इथे या उराशी
जरा सोबतीला मनाच्या तळाशी
राहशील का??

तुझ्या आठवण इथे साहतो मी
तुला साहतो मी तशी तू मलाही
साहशील का??

स्पर्श..

तु ओळखावे मला तो हर्ष आज झाला..
तुझ्या मनाचा मला तो स्पर्श खास झाला..

अजाण होते विसाव्याचे ठिकाण माझे
विरून गेल्या दिशा तो गोड भास झाला..

इलाज आहे कुठे ? गहिवरण्यास येथे..
निरोप माझा आता त्या आसवांस झाला..

तु घेऊन आलीस स्पर्श चांदण्यांचे..
अन् चांदराती आठवणींचा प्रवास झाला..

निशब्द झालो अता मी प्रियेच्या समोरी..
हवाहवासा असा तो आज त्रास झाला..

हेच प्रेम ना ????

ओढ़ लागली कशी ही, सख्या साजना
नकळत जे घडले अलगद, हेच प्रेम ना ????
हुरहुर ही मनी दाटे
जवळी तु नसे
दर्पणात पहाताना
तूच तु दिसे
समजाऊ मी उमजाऊ मी, कशी या मना
नकळत जे घडले अलगद, हेच प्रेम ना ???
पाहताना तुज समोरी
पापणी झुके
भाव येती ...

चेलेंज - Challenge ..हृदयस्पर्शी कथा

एकदा एक मुलगा त्याच्या प्रेयसीला Challenge करतो कि,
 
"एक पूर्ण दिवस तू माझ्याशिवाय राहून दाखवायचे,
मला फोन, मैल, मेसेज काहीही करायचे नाही ............................
जर तू अस करून दाखविलेस तर मी तुझ्याशी लगेच लग्न करेन ........!!!"

मुलगी म्हणाली, "खरे तर मला एक क्षण सुद्धा तुझ्या शिवाय राहायचे नाहीये ........... पण तरीही आज तू मला challenge केले आहेस म्हणून मी एक पूर्ण दिवस काहीही contact न करण्याचे challenge स्वीकारत आहे !".

एक पूर्ण दिवस काहीही contact न करता जातो.

 दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी  ती मुलगी खूप उत्सुकतेने त्या मुलाला भेटायला त्याच्या घरी जाते .................. पण ...............
घरात पोचताच ती तिच्या प्रियकराची पांढर्या शुभ्र कापडात ठेवलेली  व वरती हार घातलेली  body बघते

आणि तिला एकदम खूप मोठा धक्का बसतो .............
तिला हे अस कस झाले ??? , का झाले ????? .....काहीच कळत नव्हते..............
रडावे तर अश्रूंचा पूर येईल, शांत तर राहातच येत नव्हते ...... कंठ दाटून आलेला ......
सर्व आठवणी डोळ्यासमोर एक क्षणात उभ्या राहिल्या ........  
 
तेव्हड्यात त्याच्या आईने त्याने तिच्यासाठी  लिहिलेली चिठी तिच्याकडे दिली त्यात लिहिले होते ,
 " कर्करोगाच्या आजरामुळे माझ्या कडे शेवटचा एकच दिवस राहिला होता म्हणून मला तुला challange करावे लागले ................आणि तू ते करून दाखविलेस,  Baby...... , आता फक्त हेच तुला रोज करायचे आहे .......!!!"

नशिबातच प्रेम नाही..........

का कळत नाही पण हल्ली मन जरा कठोर झालंय
प्रेम या शब्दातला जिव्हाळा थोडा कमी झालाय
प्रेम प्रेम प्रेम बस झाल आता
अरे ! एखादी गोष्ट आयुष्यात आपली होणारच नाही मग त्या गोष्टीचा विचार करावा का
तिलाही माहितीये कि ती माझी होऊ शकत नाही
आणि मलाही माहितीये कि मी तिचा होऊ शकत नाही
दोघांची कळकळ अशी झालीये जस अळवाच पान आणि त्यावरचा थेंब
स्पर्श होऊ शकेल पण एक जीव उभ्या जन्मात शक्य नाही
माझ्या मनातल्या भावना तिच्या मनात कधीच पोचल्यात आणि तिच्या मनातल्या
भावनाही माझ्या मनात कधीच पोचल्यात
दोघांचीहि भावनेत प्रेम आहे दोघानाही माहितीये पण या भावना व्यक्त का होत नाहीत
नाही ! त्या कधीच होणार नाहीत
त्यामागे एकाच कारण असाव दोघानाही एकाच बंधनान जखडून ठेवलंय
"संस्कार" !!!

नेहमीच वाटतं मला .........कविता

नेहमीच वाटतं मला

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
आणि मिठीत विसावताना
तुला जगाचं भान नसावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
बरसणाऱ्या पाऊसधाराना
दोघांच्या ओंजळीत टिपावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
हातात हात गुंफून
चार पावलं सोबत चालावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
माझ्या प्रीतीचं प्रतिबिंब
तुझ्या डोळ्यात उमटावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू नेहमी हसावं अन
हसताना मी तुला बघावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या विखुरलेल्या बटांना
मी अलगद सावरावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
चिमुकल्या डोळ्यातील
तुझं आभाळ स्वप्न बघावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
दुध पाण्यासारखं हे
आपलं प्रेम एकजीव व्हावं


नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू माझ्या अन मी तुझ्या
स्वप्नांना बळ द्यावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या संगतीनं मग
आपल्या प्रेमाचं पिक बहरावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
विस्कटलेल हे घर नी
मन माझं तू सावरावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या ओठावरले ते ' अमृतकण '
माझ्या ओठांनी अलगद टिपावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
सहवासाने तुझ्या मग
माझ्यात बारा हत्तीचं बळ यावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू माळलेल्या मोग-याने
मग बेधुंद दरवळाव..

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुटलेल्या स्वप्नांना पुन्हा
तुझ्या डोळ्यात सजवावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
चुकलेल्या हुकलेल्या क्षणांना
पुन्हा एकवार जगावं 

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
भारलेल्या या क्षणांना
मी निरंतर जपावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझं माझं गुपित तू
नजरेनं उलगडावं.

नेहमीच मला वाटतं
तू माझ्या जवळ असावं
माझ्या प्रत्येक सुखाशी
तुझं नातं असावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
घड्याळाच्या काट्याने मग
त्याच क्षणावर थांबावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या जवळ असण्यानं
माझ्या प्रयत्नाना बळ यावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
सोबतीने तुझ्या सखे
प्रेमाचं हे गौरीशंकर गाठावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
दिव्यांच्या प्रकाशात
तुझं तेजोमय रूप बघावं 

फुलांनी रुसावे अशी कोमला तू........

फुलांनी रुसावे अशी कोमला तू, सलांनी फुलावे अशी प्रेमला तू

तुझा मखमली स्पर्श वाऱ्यासं होतो, वाहणे विसरतो तो धुंद होतो
कसा त्या कळावा तुझा गोड कावा, कुणीही फसावे अशी मृगजळा तू

असे रुप लपवू नको फार आता, खुळा जाहला केशसंभार आता
मला गुंतू दे त्यात भ्रमरापरी गे, किती धावियू अक्षयी मधफुला तू

फुलांनी रुसावे अशी कोमला तू

कधी कसे कुठे भेटलो आपण ........

कधी कसे कुठे भेटलो आपण, अजुनी वेचतो मी ते क्षण कण !

जरी एकटा भासे तुला, तुला आठविता नसे एकटा
गीत हे तुझे तुजलाच अर्पण, अजुनी वेचतो मी ते क्षण कण !

तुझा छंद जेंव्हा मला लागला, तुझ्यावीण काही सुचेना मला
शिशीरात बरसावा रिमझिमता श्रावण, अजुनी वेचतो मी ते क्षण कण !

एक मी सांगतो तू ऐकून घे, शब्द मी तुजला दिला हा अगे
यापुढचे सारे होतिल क्षण सण, अजुनी वेचतो मी ते क्षण कण !

प्रेम रंगात रंगुनी ,प्रित झंकारते मनी ............

!!..प्रेम रंगात रंगुनी ,प्रित झंकारते मनी ..
अंतरंगात ऐकू ये साद ,हो तसे जिव बावरा ...
न तुला बोलवे,ना मला बोलवे,
नयन हे बोलती एकमेकांसवे.,धुंदगंधात राहुनी गित ये आकारूनी,
अंतरंगात ऐकू ये साद ....हो तसे जिव बावरा..!!

** कधी 'तू' असा..कधी 'तू' तसा..**

कधी तू असा अबोल की..
वाटते,शब्द द्यावेत तुला उधार,
की,शब्दांचे वादळ तर नसते तुझ्या मनात ?

कधी तू असा बोलका की..
वाटते,तुझ्या शब्दांत वाहून जाईल मी,
की,रित्या शब्दांचे तुझे गुपित मला समजत नाही ?

कधी तू असा शांत की..
वाटते,तुझ्या ह्रदयात विरघळावे मी,
की,वादळापूर्वीची ही शांतता तर नाही ?

कधी तू असा अशांत की..
वाटते,चंदन व्हावे मी तुझ्यासाठी,
की,आगीशी संग मी करत तर नाही ?

कधी तू इतका जवळ की..
वाटते,तुझ्या श्वासांचीही चाहुल घेतेय मी,
की,मला तुझ्यावर विश्वास नाही ?

कधी तू इतका दूर की..
वाटते,तुझ्याशिवाय दुनिया माझी रिती,
की,आपल्यातले अंतर मी मोजलेच नाही ?

कधी तू असा..कधी तू तसा..
वाटतो तरीही, मला हवाहवासा,
की,'प्रेमा'च्याच 'प्रेमा'त आहे मी ?

पण तरीही,'तू' मला हवाहवासा..हवाहवासा..

कधी तू......

कधी तू रिमझिम झरनारी बरसात कधी तू चम् चम् करणारी चांदरात

कधी तू
कोसळत्या धारा, थैमान वारा , बिजलीची नक्षी अम्बरात
सळसळत्या लाटा , भिजलेल्या वाटा, चिम्ब पावसाची ओली रात

कधी तू अंग अंग मोहरनारी, आसमंत मोहरनारी
रात रानी वेड्या जंगलात,
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकल्यात

जरी तू
कळले तरी न कळनारे दिसले तरी न दिसणारे विरनारे मृगजल एक क्षणात

तरी तू
मिटलेल्या माज्या पापण्यात कधी तू

कधी तू
कोसळत्या धारा , थैमान वारा , बिजलीची नक्षी अम्बरात
सळसळत्या लाटा , भिजलेल्या वाटा, चिम्ब पावसाची ओली रात

का कळेना ............

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे जन्मांतरीचे

एक मी एक तू,
शब्द मी गीत तू
आकाश तू, आभास तू
साऱ्यात तू
ध्यास मी श्वास तू
स्पर्श मी मोहर तू
स्वप्नात तू, सत्यात तू
साऱ्यात तू

पंख लाऊनी, उडत चालले मन हे तुझ्यासवे
तुझा मी माझी तू, कधी केंव्हा कसे जुळले बंध हे
अबोल प्रीत ही, हे नाते नवे
अजब रीत ही, हे स्वप्न नवे

या भोवताली, काही दिसेना
तू आणि मी, मी आणि तू, काही बाकी उरेना
होतो कुठे अन, आलोतं कोठे
रस्ता कुठे जाई कसा, काही कळेना

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे जन्मांतरीचे