आई ......
ममतेचा आधार
स्वर्ग सुखाचा दार
आई ......
प्रेमाचा सुखद गारवा
विश्रांतीचा प्रेमळ विसावा
आई ......
संसाराचे एक चाक
कुटुंबाच्या पाठीचे बाक
आई ......
वात्सल्याचे दुधाळ नदी
तहानलेल्या लेकराची
आई ......
कल्परुक्षाचे मूळ
समाधानाचे गोड फळ
आई ......
जगताची माउली
प्रेमाची सावली
आई ......
विश्वासाचा हात
सर्व संकटावर करी मात
आई ......
कुटुंबाचा श्वास
भरावी मोहाचा प्रेमळ घास
आई ......
पोर्णीमाचा शीतल प्रकाश
फुलांचा सोज्वळ सुवास
आई ......
करुणेचा विशाल सागर
मायेचा मखमली पदर
आई ......
उगवती सोनेरी सकाळ
मावळती चंदेरी रात्र
आई ......
शब्दांचा प्रेमळ जयघोष
जिव्हाळ्याचा मधुर कोश
आई ......
लक्ष्मीची सोनेरी पाऊल
स्वप्नी आनंदाची चाहूल
आई ......
आशिर्वादाची छत्रछाया
सुखी संसाराची माया
आई ......
सुसंस्काराची जणू समई
मुले जणू फुले जाई जुई
आई ......
प्रत्येकाच्या घराचा पाया
त्याविना घर वाया
आई ......
देई जगण्याला सोनेरी चमक
कुटुंबातील घुंगराची धमक
आई ......
कल्पतरू माझ्या आयुष्याची
माझ्या आयुष्याची एक चित्रकार
आई ......
आत्मा आणि ईश्वराचे स्वरूप
भूतलावरील भगवंताचे रूप
आई ......
माझी रत्नजडीत आठवण
तिच्या विरहाची वणवण
आई ......
पाठीवरची मायेची थाप
तुजवीण जीवन आहे एक शाप
आई ......
नसलेल्या अस्तित्वाचा तुझा तो पदर
करुणेने दाटून आली माझ्या मनाची चादर
आई ......
काळाच्या पडद्याआड जरी गेली तुझी छाया
त्या छायेत हरवली माझी काया
आई ......
तुझी आठवण येते परत कधी येशील
मायेचे प्रेमळ घास परत मला कधी भरवशील
आई ......
कधी या पिल्लाला गौनजार्शील
परत कधी ती अंगाई गाशील

No comments:
Post a Comment