Powered By Blogger

Sunday, April 10, 2011

एक नादखुळं.............

एक नादखुळं उनाड पाखरू होतो मी,
त्याला हवहवसं फूल होतीस तू..
बेधुन्द नदीसारखा होतो मी,
त्याला दिशा देणारे काठ होतीस तू..
एका को-या पानासारखां होतो मी,
त्यावर शब्दा लिहणारी होतीस तू..
शब्दभावनेचा वेडा सागर मी,
भरती ओहोटीचा चन्द्र होतीस तू....

मी तुला..........

मी तुला माझी सावली समजत होतो,
अशी सावली - जी कधीही साथ न सोडून जाणारी,
दुनियेला अभिमानाने सांगत होतो आपलं अटूत नातं,
पण, मी हे विसरून गेलो होतो की -
सावली ही साथ सोडून देते - "अंधारात"...

Saturday, April 9, 2011

इतुश्या आयुष्यात...

इतुश्या आयुष्यात मी काय काय पाहिले
आज अचानकच याच्या हिशोबास बसले...

अनुभवला तो बालपणीचा निरागसपणा
कधी हासू तर कधी मस्तीचा तो नझराणा...

अभ्यासासाठीचा आईचा धाक कधी
तर मिळे छान कौतुकाची थाप कधी...

बाबांचा तर असे फार जीव
कशाला भासेल मग कुठलीच उणीव...

शाळेत होते अगदी पुस्तकी किडा
कॉलेजमध्ये उचलला खोडकरपणाचा विडा...

पाहिला मग पहिल्या पगाराचा आनंद
चालले होते हे आयुष्य छान बेधुंद...

वळणावळणाच्या या आयुष्यात
पाहिले मी भावनांचे रंगही सात...

पाहिली कधी आनंद देणारी नाती
तर कधी नकोशी झालेली नाती...

लाभली सुखदायी खुपशी मैत्री
आहे जिथे विश्वासाची खात्री...

कधी दिला सा-यांना मायेचा अनुराग
तर कधी कुणा दिला भयंकर राग...

मिळाला कधी विश्वासघाताचा अनुभव
तर कधी कुणी विश्वास न ठेवण्याचा घाव...

हुळहुळणा-या प्रेमाची गोडी चाखली
मग विरहाची मजाही घेतली...

होवून गेले कुणा परक्याचे जवळचे
तर कधी कुणा आपल्याचे लांबचे...

नशिबास सुख-दु:ख दोन्हीही आले
कडू-गोडश्या अनुभवाने हे आयुष्य भरले...

काय बरे असेल पुढचा नियतीचा घाट
याचीच पाहत आहे मी आता वाट...

इतुश्या आयुष्यात आता काही पहायचे ना उरले
नसे खंत कसलीच आज जरी हे डोळे मिटले...

स्वप्न्नसख्या...

तुझे ते चिडून जाणे माझ्यावर
मग हळूच स्वत:ला सावरणे...

कधी खळाखळा हसता हसता
खोड्या माझ्या त्या काढणे...

लटक्या माझ्या रागासाठी
तुझे तास न तास मनवणे...

धरिता अबोला मी जर
तुझे ते कासाविस होणे...

चुक झाली कितीही मोठी
तरीही तुझे माफ़ करणे...

डोळ्यात येता आसवाचा पुर
तू हलकेच माझी टीपे पुसणे...

चिडले असता कधी मी
ते इवलासा चेहरा करणे...

फुलासारखे जपता जपता
सगळा त्रास स्वत:च घेणे...

जरी असले मी सामान्य
तुझे मला ते ख़ास बनवणे...

स्वप्न्नसख्या पुरे आता स्वप्न्नातल्या भेटी
कधी रे होईल तुझे वास्तवात येणे...

Thursday, April 7, 2011

आठवण माझी..................

आठवण माझी कधीतरी येईलच तुला,
तु कदाचीत रडशीलही,
हात तुझे जुळवुन ठेव तु,
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील,
जो थांबला तुझ्या हातावर,
नीट बघ त्याच्याकडे,
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल.....

Sunday, April 3, 2011

कोणाच्या तरी येण्याने..........

♥ कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं
आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं
जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं
यातला फरक समजू लागतो
नाही नाही म्हणता आपणही
प्रेमात पडू लागतो ♥

♥ कधी हसणं विसरून गेलो तर
ते हसायला शिकवतात
जीवन हे खऱ्या अर्थाने
जगायला शिकवतात ♥

♥ पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात....
आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं
त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं
कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,
प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी
...

आजही मी ...!

आजही मी ...!

आजही मी तसाच आहे
जसा पुर्वी होतो,
पण...,
तुलाच कसा दिसत नाही.

आजही मी तिथेच उभा आहे
जिथे पुर्वी तुझी वाट पाहत उभा असायचो
मग...,
तुलाच कसा गवसत नाही.

आजही तेच अश्रु डोळ्यात आहे
जे पुर्वी माझ्या डोळ्यात असायचे
पण...,
ते पाहुनही तुला कसे काही वाटत नाही.

आजही तुझेच नाव ओठावर आहे
जे पुर्वी नेहमीच ओठात असायचे
पण...,
तुला कसे एकू येत नाही.

तुझी मात्र कमालच आहे
सर्व काही ठाऊक आहे तुला,
मग...,
समोर असुन हा लपनडाव कुणासाठी?

धुळीत हरवलेली विराणी............

धुळीत हरवलेली विराणी...माझी...
तुझ्या पावलांत हरवुन गेली...
शब्द..हरवले..
अन अवचीत...
कहाणी माझी सरुन गेली.
निर्ढावलेल्या भावनांना...
आठवांचा पुर येतो...
तुझ्या खुळ्या आठवणीत हरवताना..
चंद्राचाही उर भरुन येतो
डोळे मिटताच...
ती आजही स्वप्नात येते..
इतकं सारं घडुनही
आजही का ती मला अशी छळते?
आजही का ती मला अशी छळते?

तुला काय किंमत.........

तुला काय किंमत

एकटेच चालणे
प्राक्तन माझे होते..
आजवर तुझ्या सोबत पाहीलेलं...
सजवलेलं...रंगवलेलं
प्रत्येक स्वप्न माझे होते...
तुला काय किंमत असेल
माझ्या असण्या-नसण्याची..
मुठीतुन अलगद निसटणारे
श्वास माझे होते
आजही वाट पाहाताना तिची...
रात्र सरुन गेली....
तिची ही नेहमीची सवय....
उशीरा येण्याची...
बस....माझीच चुक मलाच नडली....

प्रेम..म्हणजे............

प्रेम..म्हणजे जपलेलं पिंपळपान
प्रेम म्हणजे आशेचा किरण.
आभाळही गोंदायला लावणारा,
एक नाजुक भावक्षण
त्या आठवांमध्ये नकळत ..मनं फ़सतं
माझं तिच्यावरचं प्रेम..
अजुनही माझ्या कवितांमध्ये दिसतं
प्रेम...म्हणजे कधी कधी डोळ्यात अश्रु आणतं
ति जवळ नसताना
तिच्या आठवांत नकळत हरवतं
प्रेम....कधी मंद तेवती समई...
कधी फडफडता दिवा असतं
प्रेमात पडल्यावर काय करायचं?
कोणालाच माहीत नसतं...
प्रेमाच्या ह्या खेळात,
एक साधं मन फसतं
आपणं सगळेचं वेडे
कोणाच्या ना कोणाच्या प्रेमात फसलेले
रंगलेले तरी
कृष्णधवल चित्रापरी
त्या मोकळ्या भिंतीवर टांगलेले........

जिवनाची गाडी तुझी...!

जिवनाची गाडी तुझी...!

मन सोडुनी आज आलो
स्वछंदी बागेत रमलो
बसलो कितीही एकटा
शब्दाविना हा खोटा

प्रवासी म्हणून प्रवास करत होतो
धावत्या गाडीबरोबर जाण्याचा,
प्रयत्न करत होतो
इतक्यात मग आवाज येतो

न ठाव या मनाची
रमत उडना-या पाखराची
उगीच बघत बसलो
विनाकारण तिच्यात फ़सलो

नजर तिची ती काटेरी
मज काळजाला ठोकरी
तरी पाहण्याची हुरहुर मानावी
ह्रुदयाच्या बिट ती वाढवी

मन माझे हे कोवळे
जसे नित्य-नियम पाळे
उगाच चेष्टा माझी करुनी
मन माझे कानी म्हणी

अरे वेड्या,
समोर असतना पाहत रहा
निघूनी गेल्यावर चालत रहा
जिवनाची गाडी तुझी,
आली तशी चालवत रहा.

प्रेम म्हणजे.........

प्रेम म्हणजे,
दोघाच सुंदर स्वप्न असत,
प्रेम म्हणजे,
तु आणि मी नाहि,
प्रेम म्हणजे "आपण" असत,
...प्रेम म्हणजे,
एकाच रुसण तर,
दुसऱ्याच समजावण असत,
प्रेम म्हणजे,
दोन जिव एक असण असत..

निर्णय चुकतात आयुष्यातले........

निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकतजाते,
प्रश्न कधी कधी कळत नाहीत आणि उत्तर चुकत जाते,
सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता,
पण प्रत्येक वेळी नवनवीन गाठ बनत जाते,
दाखविनाऱ्याला वाट माहित नसते,
चालणाऱ्याचे ध्येयमात्र हरवून जाते,
दिसतात तितक्या सोप्या नसतात
काही गोष्टी,"अनुभव"म्हणजे काय हे तेव्हाच कळते