Powered By Blogger

Sunday, April 3, 2011

आजही मी ...!

आजही मी ...!

आजही मी तसाच आहे
जसा पुर्वी होतो,
पण...,
तुलाच कसा दिसत नाही.

आजही मी तिथेच उभा आहे
जिथे पुर्वी तुझी वाट पाहत उभा असायचो
मग...,
तुलाच कसा गवसत नाही.

आजही तेच अश्रु डोळ्यात आहे
जे पुर्वी माझ्या डोळ्यात असायचे
पण...,
ते पाहुनही तुला कसे काही वाटत नाही.

आजही तुझेच नाव ओठावर आहे
जे पुर्वी नेहमीच ओठात असायचे
पण...,
तुला कसे एकू येत नाही.

तुझी मात्र कमालच आहे
सर्व काही ठाऊक आहे तुला,
मग...,
समोर असुन हा लपनडाव कुणासाठी?

No comments:

Post a Comment