प्रेम..म्हणजे जपलेलं पिंपळपान
प्रेम म्हणजे आशेचा किरण.
आभाळही गोंदायला लावणारा,
एक नाजुक भावक्षण
त्या आठवांमध्ये नकळत ..मनं फ़सतं
माझं तिच्यावरचं प्रेम..
अजुनही माझ्या कवितांमध्ये दिसतं
प्रेम...म्हणजे कधी कधी डोळ्यात अश्रु आणतं
ति जवळ नसताना
तिच्या आठवांत नकळत हरवतं
प्रेम....कधी मंद तेवती समई...
कधी फडफडता दिवा असतं
प्रेमात पडल्यावर काय करायचं?
कोणालाच माहीत नसतं...
प्रेमाच्या ह्या खेळात,
एक साधं मन फसतं
आपणं सगळेचं वेडे
कोणाच्या ना कोणाच्या प्रेमात फसलेले
रंगलेले तरी
कृष्णधवल चित्रापरी
त्या मोकळ्या भिंतीवर टांगलेले........

No comments:
Post a Comment