तुला काय किंमत
एकटेच चालणे
प्राक्तन माझे होते..
आजवर तुझ्या सोबत पाहीलेलं...
सजवलेलं...रंगवलेलं
प्रत्येक स्वप्न माझे होते...
तुला काय किंमत असेल
माझ्या असण्या-नसण्याची..
मुठीतुन अलगद निसटणारे
श्वास माझे होते
आजही वाट पाहाताना तिची...
रात्र सरुन गेली....
तिची ही नेहमीची सवय....
उशीरा येण्याची...
बस....माझीच चुक मलाच नडली....

No comments:
Post a Comment